--------------------------------------------Hi--------------------------------------------------
31 December comes only once in a year [like every other date] but still we wait for this particular day right from Jan 2nd. This is a group blog where me and my buddies will share their experinces\plans\memories\fantacies about ther New year eve celebrations. Let's start with my idea of an Ultimate New year celebration...ofcourse with Happy New year wishes...
-------------------------------------------------------------------------------------------------
31 December
माझ्या इन्बोक्स च्या प्रत्येक रिफ्रेशगणिक आज नवा forward येत होता, त्यातले बहुतेक मला गेल्या वर्षीदेखील आले होते. त्या forwardsमधून नविन वर्षाचा उत्साह कमी आणि आला मेसेज पुढे फोरवर्ड करण्याची इतिकर्तव्यता जास्त दिसत होती. असो, पण वातावरण बाकी मस्त होते, हैदाराबादाच्या हलू-हलू (इथे मी खुप प्रयत्न करुनही "ळ" नाही लिहू शकलो याची कृपया वाचकानी नोंद घ्यावी.) कमी होत जाणार्या थंडीने अचानक उचल खाल्ली होती. कपाटात गेलेले जर्किन पुन्हा काढून घालण्यात काही औरच मजा आहे. वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून चेन्नईच्या 6 मजली दुकानातून घेतलेला शॉर्ट कुर्ता मी घातला होता. Officeमध्ये शिरता शिरताच त्यातल्या त्यात बर्या दिसणार्या 1-2 मुलीनी "Ohh! nice shirt(??)" असे उद्गार काढले आणि एक कौतुकास्पद कटाक्ष टाकून निघून गेल्या तेव्हाच मी ओळखले की आजचा दिवस चांगला जाणार.
माझ्या office तर्फेचे सेलेब्रेशन आधीच उरकले होते, 29 तारखेला विप्रॉने खास New Year Bash organize केला होता. ग्रूपचे अर्ध्याहून अधिक पब्लिक आधीच आपापल्या घरी पळाले होते त्यामुळे माझा ही functionला जाण्याचा काही मूड नव्हता, पण साक्षात रूम पार्ट्नरचा स्टेजवर performance म्हणजे तर जायलाच हवे. विनयने मस्त Hotel California वाजविले आणि त्यानंतरचा DJ पण ठीकठाकच होता. पण प्रश्न होता तो
31st सेलेब्रेशनचा.
IT industry मध्ये एक कमालीचा तोच-तोचपणा साचलेला आहे आणि अश्यावेळी तो अजुन प्रकर्षाने जाणवतो. तेच टिपिकल फॉरवर्ड्स् आणि SMS , orkut वरती display name बदलणे, एकमेकांना समोर
बघून अगदी आनंदाचे उधाण आल्यासारखे वागणे, आमचे ख्याली-खुषाली विचारायचे प्रश्न पण तेच "Hey, Wots Up?", 'How u doing?", " Hi, Howz life?" ह्याच्या पुढे तर आम्ही जात पण नाही, सगळे कसे एक ready template मध्ये असल्यासारखे. निदान ह्या वर्षी तरी काही वेगळे होईल अशी आशा होती पण, alas!. New Year bashचा आमचा ड्रेस कोड पण तोच, पुन्हा ब्लॅक अँड पिंक (आणि पुन्हा काळे कपडे शोधायची धावपळ) पण माझा नवीन रूमपार्ट्नर अगदी देवदुतासारखा (की यमदूतासारखा?) काळे कपडे घेऊन धावून आला. खास New Year मेनुच्या नावाखाली पुन्हा तीच पुरी भाजी आणि फ्रूट कस्टर्ड खायला घातले
पण फुड कूपन्ससाठी लागलेल्या तुटपूज्या गर्दीवरुन लक्षात येत होते की बहुतेक जनता मस्त घरीबसून
संध्याकाळचे बेत आखते आहे. आणि जे होते त्यांच्या बोलण्यात पण placida resorts आणि अभिजीत सावंत concert आणि ताज Banjaracha 'Buffet with DJ'चाच उल्लेख होता. थोडक्यात काय तर मी सोडून सगळ्याना ठाउक होते की आज संध्याकाळी ते काय करणार आहेत, मला मात्र मागल्या 24 New year eves (well not exactly 24)आठवत होत्या. Gate of India जवळ भटकताना, शेवटची ट्रेन मिस तर होणार नाही ना म्हणून घाईघाईत उरकलेला 31st, तुहीनच्या गच्चीवर त्याच्या कॉलोनी मधल्या लोकांची अंताक्षरी
ऐकता ऐकता घालवलेला 31st, सुमीतच्या घरी TV वर एखादा तरी चांगला प्रोग्रॅम लागेल म्हणून channels स्कॅन करत वाया गेलेला 31st, नेहरू नगर, बिल्डिंग 156 मधल्या आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर Intellectual debate (थोडक्यात प्रचंड वाद-विवाद) करत साजरा केलेला 31st आणि घरी बसून आई बाबाबरोबर नातेवाईकाना आणि मित्र-मंडळींना फोन वर शुभेच्छा देत देत गेलेला 31st. आज अगदी सगळे सगळे आठवत होते.
Thankfully, सेलेब्रेट करण्यासाठी विकतच्या नशेची गरज कधी पडलीच नाही आणि ह्या पुढेही ती पडू नये. मला नेहमी प्रश्न पडतो, New Yearच्या नावावर पेग्स रिचवणा र्या ह्या लोकानी ज्या नवीन वर्षाच्या स्वागताची एवढी जोरदार तय्यारी केली, त्या नवीन वर्षाचा सूर्य कधी उगवताना पहिलाय? तसा तर तो मी पण कधीच नाही पहिलाय.
Eurekaaaaaaaaaaaaaaaaaaaaa!!!!!!!!!!!! .....................आणि अचानक मला काय करायचेय ते कळले.
6 वाजले, तुषारचा फोन आला, रात्री घरी येणारेस का विचारले
मी बोललो " नाही"
तुषार:" का? काही दुसरा प्रोग्रॅम आहे का?"
मी म्हणालो "हो, मला लवकर झोपायचेय, उद्या सकाळी 1 जानेवारीचा सूर्य उगवताना पाहायचाय"
जिव्हाळ्याच्या काहीना नवीन वर्षाच्या शुभेच्छची mail केली. सगळ्या colleaguesna अगदी IT style मध्येच wish करून एक वेगळ्या पध्दतीने New Year साजरा करण्यासाठी थेट घर गाठले.
2 comments:
मला नेहमी प्रश्न पडतो, New Yearच्या नावावर पेग्स रिचवणा र्या ह्या लोकानी ज्या नवीन वर्षाच्या स्वागताची एवढी जोरदार तय्यारी केली..........
I object My Lord!!!!!!!!
Since this is English new year and not Indian new year(where day starts with "Suryoday"),this argument does not make sense..
Day has already started @ 12AM and we are "awake" at that time.
Ans its not like we are drinking all the year..
Best HD Wallpapers
Post a Comment